गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत एवढी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

२०१४ साली नरेंद्र मोदींनी उमेदवारी अर्जात आपली संपत्ती जाहीर केली होती. त्या आधारावर त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली याची माहिती मिळाली. २०१४ साली मोदींकडे स्थावर आणि जंगम मिळून अशी १ कोटी ५१ लाख ५८२ रुपये संपत्ती होती. त्यात वाढ होऊन ती २.२८ कोटींवर गेली आहे. गेल्या साडेचार वर्षात मोदींच्या संपत्तीत ७५ लाखांनी वाढ झाली आहे.

२०१४ मध्ये मोदींकडे २९ हजार रोख रक्कम होती, आज त्यांच्याकडे ४८ हजार ९४४ रुपये इतकी रोख रक्क्म आहे. २०१४ मध्ये पोस्टात साठवलेले ४ लाख ३४ हजार ३१ रुपये होते. आज स्टेट बँकेत त्यांचे ११ लाख २९ हजार ६९० रुपये जमा आहेत. २०१४ मध्ये त्यांचे फिक्स डिपॉजिटच्या स्वरूपात ४४ लाख २३ हजार ३८३ रुपये जमा होते. सध्या मोदींच्या नावाने फ़िक्स डिपॉजिटच्या स्वरुपात १ कोटी ७ लाख ९६ हजार २८८ रुपये जमा आहे. २०१४ साली इन्फ़्रास्टक्चर बाँड स्वरुपात २० हजार रुपये जमा होते आजही तितकीच रक्कम त्यांच्या नावे जमा आहे.

२०१४ साली मोदींकडे १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने होते, गेल्या चार वर्षात त्यांच्या किंमतीत तीन हजारांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये व्याज स्वरुपात त्यांना १ लाख १५ हजार ४६८ रुपयांचा परतावा मिळाला होता. सध्या एलआयसीच्या स्वरुपात मोदींकडे १ लाख ५९ हजार २८१ रुपये आहेत.

स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून मोदींकडे एकूण २.२८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीत १ कोटी २८ लाख रुपयांची संपत्ती ही स्थावर स्वरुपात आहे. पंतप्रधान मोदी यांनी २००२ साली एक लाख रुपयांत गांधीनगरमध्ये ३५५३१.४५ स्के.फुट जागा विकत घेतली होती. मोदींच्या नावाने कुठलीच गाडी नसून पंतप्रधानपदी आल्यापासून त्यांनी कुठलेच दागिने विकत घेतलेले नाहीत.