
सामना ऑनलाईन । खेड
कोकणातून चाकरमानी मुंबईत परताना कोकण रेल्वेत गोंधळ झाला आहे. खेड स्थानकावर आरएसी तिकीट धारकांना डब्यात प्रवेश न दिल्याने गोंधळ झाला आहे. मांडवी एक्सप्रेस आणि दिवा पॅसेंजरमध्ये ही घटना घडली आहे. खेड स्थानकावर दरवाजेच न उघडल्याने आर एअसी तिकीट धारक आणि पोलिसांत बाचाबाची झाली आहे.




























































