
सामना ऑनलाईन । मुंबई
भाजप आमदार राम कदम यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार नसीम खान यांचा पराक्रम उघड झाला आहे. चांदिवलीतल्या एका गणेशोत्सव कार्यक्रमात खान यांच्यावर नोटांची अक्षरशः उधळण करण्यात आली. याबाबतचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
नसीम खान यांनी मात्र याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला आहे. हिमालय मित्र मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात हा प्रकार घडला. पैसे उडवणाऱयांमध्ये मनसेच्या महेंद्र भानुशाली या पदाधिकाऱयाचाही समावेश आहे. नसीम खान यांनी मात्र हा व्हिडीओ जुना असल्याचा दावा केला आहे. आपण कार्यकर्त्यांना पैसे उडवण्यापासून रोखल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपण भानुशाली समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांच्या रूढी-परंपरांविषयी आपल्याला माहिती नव्हती. तसेच त्यांच्या परंपरांमध्ये मला हस्तक्षेप करायचा नव्हता त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले.
























































