
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरीतल्या परटवणे येथे दोन मित्रांमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर जिवघेण्या हाणामारीत झाले आहे. सागर शिर्के आणि संतोष सावंत हे दोघे खुप चांगले मित्र होते. मात्र गुरुवारी या दोघांमध्ये किरकोळ करणावरून झालेल्या वादातून संतोषने सागरच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार केले. या हल्यात सागर गंभीर जखमी झाला आसून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी संतोष सावंत विरोधात शहर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर रिक्षा व्यावसायिक असून गुरुवारी सकाळी रिक्षा घेऊन मासे आणण्यासाठी जेटीवर गेला होता. मासे घेउन आल्यावर त्यातील काही मासे शेजारी राहणाऱ्या महिलेला दिल्याच्या रागातून संतोषने हा हल्ला केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शहर पोलीस अधीक तपास करत आहेत.




























































