नात्याचा सुंदर गजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील तावडे, अभिनेते

  • आपला जोडीदार : सोनाली सुनील तावडे
  • लग्नाचा वाढदिवस : 6 डिसेंबर
  • त्यांचे दोन शब्दात कौतुक : उत्तम गृहिणी, नात्याची जपणूक करणारी.
  • त्यांचा आवडता पदार्थ : पुरणपोळी
  • एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ : मांसाहार काहीही.
  • वैतागतात तेव्हा : सगळे नवरे जे करतात ते. गप्प बसतो.
  • त्यांच्यातली कला : पाककला आणि नेतृत्वगुण
  • त्यांची गंमत करायची असल्यास : तिला टेन्शन देतो आणि मग सरप्राईज देऊन खूश करतो.
  • त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ :‘गँगस्टर’ चित्रपटातील तू ही मेरी शब है, सुबह है..
  • तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान : आई-वडिलांनंतर तीच.
  • भूतकाळात जगायचे असल्यास कोणते दिवस जगाल : तिच्यासोबत केलेली परदेशवारी.
  • कठीण प्रसंगात त्यांची साथ : कायमच असते.
  • विश्वास म्हणजे : निरपेक्ष प्रेम.
  • आठवणीतला क्षण : माझ्या मुलीचा जन्म झाला तो क्षण.

आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट

गजरा तिला फार आवडतो आणि मी एकदाच तिच्यासाठी गजरा घेऊन गेलो होतो. तेव्हा तिला फार आनंद झाला होता. तिची खूप इच्छा असते की मी तिच्यासाठी एखादा गजरा घेऊन यावा. पण मी त्यानंतर तिला एक गजरा घेऊन देऊ शकलो नाही ही खंत माझ्या मनात आहे. तसेच तिची माझ्यासोबत बाहेर फिरायला जायची इच्छा असते तर तोही तिला वेळ देता येत नाही. तिची ईच्छा असतानाही तिला हवा तसा वेळ मला देता येत नाही आहे. त्यासाठी मी तुझी मनापासून माफी मागतो. पण एवढे नक्की सांगतो तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण करेन.