
सामना प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्राला वीजपुरवठा करणारे महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने राज्यात 500 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रकल्पासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या असून ही प्रतिक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. असे महावितरणने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
प्रत्येक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्राला जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पाऊण ते एका तासात वाहन पूर्णपणे चार्ज करण्यात येईल. प्रत्येक युनिटमागे सहा रुपये आकारले जातील.
पहिल्या टप्प्यात 50 केंद्रे
पहिल्या टप्प्यात 50 इलेक्ट्रिक वाहन केंद्रे उभारण्यात येणार असून मुंबई, नवी मुंबई, पनवेल (4), ठाणे (6), पुणे, नागपूर (10) आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (12) यांचा समावेश असेल.
summary-electric charging units for vehicle



























































