विसर्जनानंतर अभिनेत्रीकडून समुद्र किनाऱ्याची स्वच्छता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गणपती बाप्पाचे स्वागत आपण खूपच उत्साहात, जल्लोषात करतो. परंतु विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना सगळ्यांनाच खूप दु:ख होते. आज विसर्जनाच्या दिवशी कलर्स मराठीवरील “राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेतील दिपिका म्हणजेच अर्चना निपाणकर, निकटून्स मोटू-पतलू आणि शिव यांनी ७०० विद्यार्थांसोबत (Children’s Movement for Civic Awareness CMCA) शहरातील तीन प्रमुख समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेच्या मोहिमेद्वारे शहरामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चकाचक मुंबई म्हणजेच वायाकॉम18 च्या CSR प्रकल्पाचा महत्वाचा भाग… ज्याच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून Children’s Movement for Civic Awareness (CMCA) ही संस्था गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सहभागी आहे, त्यांचा पाठिंबा लाभत आहे.

या लहान मुलांसोबत त्यांचे लाडके निकटून्स मोटू-पतलू आणि शिव, तसेच आपल्या सगळ्यांची लाडकी अर्चनाने नागरीकांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणेशोत्सव eco friendly पद्धतीने साजरा करा आणि जबाबदार नागरिक व्हा असा संदेश दिला. दरवर्षी आपल्या शहरामध्ये काय तर संपूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर देखील गणेशोत्सव उत्सव मोठ्या उत्सहामध्ये साजरा केला जातो.

प्लास्टर ऑफ पॅरिसची (पीओपी) मूर्ति आणि रासायनिक रंगांमुळे होणारे प्रदूषण आणि होणारे पर्यावरणाचे नुकसान याबाबत अजूनही समाजातील बरीच मंडळी अनभिज्ञ आहे. उत्सव साजरा करण्याच्या जबाबदारीवर सीएमसीएने नेहमीच भर दिला आहे. शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, मुले त्यांच्या शाळा आणि परिसरात इको-गणेश मोहीम चालवतात जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पर्यावरणीय प्रभावाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि पर्यावरणाला अनुकूल वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करतात.