भाजप प्रवक्ते मधू चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा चिपळूण पोलीस ठाण्यात आज दाखल झाला. अन्य पक्षांच्या नेत्यांवर आरोप करून प्रसिद्धी मिळविणाऱया प्रवक्ते मधू चव्हाण यांच्या कृत्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

मधू चव्हाण यांनी तुझ्याशी लग्न करेन, तुला पत्नीचा दर्जा देईन असे सांगून 2002 पासून 2016 पर्यंत माझी फसवणूक करून शारीरिक शोषण केले. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात ही महिला आवाज उठविण्याचा प्रयत्न करत होती. या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी सुरू झाली होती. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाविरोधात मधू चव्हाण यांनी अपील दाखल केले. या अपिलावर उच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढताच तो अर्ज मागे घेण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार चिपळूण पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चिपळूण पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम 376, 354, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधू चव्हाण यांनी तब्बल 14 वर्षे एका महिलेवर अत्याचार केला. हे प्रकरण बाहेर येताच भाजपचा बुरखा फाटला आहे. मधू चव्हाण यांच्या या लीला बाहेर पडल्यामुळे भाजप पक्ष अडचणीत सापडला आहे.