VIDEO: कोल्हापुरात दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईलने मारहाण, नागरिकांची बघ्याची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

कोल्हापूरच्या जनता बाजार चौकामध्ये एका व्यक्तिला फिल्मी स्टाईलने मारहाण करण्यात आली आहे. ओमकार शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन राजेंद्र पेडणेकर यांना ही मारहाण झाली आहे. मारहाणीची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. गडहिंग्लज येथे राहणारे पेडणेकर शैक्षणिक कामानिमित्त गुरुवारी कोल्हापूरमध्ये आले होते. शिक्षण प्रसारक मंडळासंदर्भात काहीतरी वाद होता. त्यामुळे गडहिंग्लजमधील दोघांनी पेडणेकर यांच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला आहे.

दरम्यान, राजेंद्र पेडणेकर यांना मारहाण होत असताना जमलेल्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचे वास्तव सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.