‘या’ अभिनेत्रीने तनुश्री दत्ताला दिला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांची बॉलिवूडने फारशी दखल घेतलेली दिसलेली नाही. तरीही तिच्या समर्थनार्थ एका अभिनेत्रीने एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात तनुश्रीने केलेल्या आरोपांमधील तार्किक बाजू सांगण्यात आली आहे.

ही अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. रेणुका या अनेक मुद्द्यांवर आपली परखड मते सडेतोडपणे मांडतात. त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्येही तनुश्रीच्या आरोपांमधील काही तार्किक बाजू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तनुश्रीने केलेल्या गाण्यातील एका स्टेपचा उल्लेख केला होता. त्यावेळी जर तिला नाचताना अवघडल्यासारखं होत असेल, तर तिचा हा प्रश्न किंवा त्रास सोडवण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींवर नव्हती का, असा प्रश्न रेणुका यांनी विचारला आहे. नाना पाटेकर यांचा हेतू तसा नसेलही, पण जर तुमच्यासोबत एखादी स्त्री काम करत असताना तिला अवघडलेपणा वाटत असेल, तर तो दूर होणं गरजेचं नाही का? कामाच्या ठिकाणी स्त्रीला सुरक्षित वाटू देण्याची जबाबदारी संबंधितांची नाही का? जर तिच्याजागी तुमची मुलगी असती, तर तुम्ही तिला आरामदायी वाटेल अशा वातावरणाची निर्मिती केली नसतीत का?, असंही त्यांनी आपल्या पोस्टद्वारे विचारलं आहे.

तनुश्रीने दहा वर्षांपूर्वीच तक्रार केली होती. मात्र, त्यानंतर तिची कारकिर्द संपली. पण, ज्यांचे अहंकार मोठे आहेत, ते मात्र अतिशय आरामात आपली कारकिर्द घडवताहेत. या सगळ्याचा त्रास तनुश्रीने भोगला, असंही रेणुका यांचं म्हणणं आहे.

summary- renuka shahane backs tanushree dutta