
सामना प्रतिनिधी । हिंगोली
राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यासाठी निधी मिळाला असुन अजुनही मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात केली जाणार असल्याचे आमदार डॉ. संतोष टारफे यांनी राजदरी येथे रस्त्याच्या कामाचे शुभारंभ प्रसंगी सांगितले.
औंढा नागनाथ तालुक्यातील आमदरी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत २ कोटी १५ लाख तर राजदरी येथे १ कोटी २८ लाख रुपयाच्या निधीतुन होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार राजीव सातव यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. संतोष टारफे तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा बँकेचे संचालक बाबा नाईक, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, काकडधाब्याचे सरपंच माणिकराव कर्डिले, सुहास घुगे, नंदू पाटील, बालाजी हांडे, डॉ. देशमुख, बापुराव घोंगडे, आमदरीचे सरपंच अन्नपूर्णा बेले, उपसरपंच दामाजी बेले, शंकूराव मुकाडे, भारत बेले, प्रकाश पोटे, शिवप्रसाद बेले, सरपंच स्वप्नील बुरकुले, विश्वनाथ बेले, प.स. सदस्य ससाणे, सरपंच भानुदास कर्हाळे, उपसरपंच वैजनाथ रिठ्ठे, सटवाजी कांबळे, शिवप्रसाद मुकाडे, सुरेश पोटे, अनिल पोटे, विमलताई, पोटे, पुष्पाताई बेले, मनीराव बेले, भाऊराव बेले, सोनू मुकाडे, शैलेश रिठ्ठे, रामराव कर्हाळे, मारोती कर्हाळे, आंबादास बर्गे, संदीप पाचपुते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खासदार सातव म्हणाले की, विकास ही अखंडपणे चालणारी प्रक्रीया असुन, विकास कामे होत असतांना गावच्या सुजान नागरीकांनी ही कामे कशी दर्जेदार पध्दतीने होतील यासाठी लक्ष दिले तर विकास कामाच्या निधीचे चांगल्या पध्दतीने विनीयोग होईल. राजकीय मतभेद बाजुला ठेऊन सामुहिक प्रयत्न केल्यास गावचे देखील नंदनवन होऊ शकते असेही सातव म्हणाले. कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्थित होते.





























































