परतीच्या पावसाचा कुंदे गावाला तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

सिंधुदुर्गात गेले चार पाच दिवस परतीच्या पावसाचे धुमशान सुरू आहे. सोमवारी कुडाळ तालुक्यातील कुंदे गावाला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला. वादळी वा-यासह कोसळेल्या पावसाने ठिकठिकाणी घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले. वीज, दूरध्वनी यंत्रणा पुर्णतः कोलमडून गेली.

सोमवारी दुपारी तालुक्यात सर्वत्र वीज आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. कुंदे येथे अचानक झालेल्या वादळी पावसाने गावातील अनेक घरांचे झाडे पडून नुकसान झाले. परबवाडी येथील सत्यवान महादेव परब यांच्या घरावर काजूचे झाड पडून झाले मोठे नुकसान झाले. देवूळवाडी येथील अंकुश शांताराम कदम, संतोष विठ्ठल ठाकूर, सुधाकर शांताराम कदम , दत्ताराम बाबाजी गदम, कृष्णा राघो घाडीगांवकर, सत्यवती तुकाराम कुंटे यांच्याही घरांवर झाडे पडून झाले मोठे नुकसान झाले. कुंदे ग्रा.पं.चे सरपंच सचिन कदम, उपसरपंच सुशील परब, सदस्य रुपेश तायशेटे, ग्रामसेवक वालावलकर यांनी नुकसानीची पाहणी केली. ठिकठिकाणी मोठी झाडे, माड, साग पडून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुंदे शाळा नंबर 1 तसेच समाजमंदीरचेही नुकसान झाले आहे अशी माहिती सरपंच सचिन कदम यांनी दिली