
सामना ऑनलाईन, लखनौ
भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात ब्राह्मण समजाचे शोषण होत आहे. त्या समाजाला न्याय देण्याऐवजी त्याची गळचेपी केली जात आहे असा आरोप करीत बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी ब्राह्मण समाजावरील अन्यायाविरोधात आवाज बुलंद केला.
गोमती येथे पोलिसांनी हत्या केलेले ‘ऍपल’ कंपनीचे एरिया मॅनेजर विवेक तिवारी हिंदू असताना त्यांचा जीव का घेतला, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशात विरोधक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर तुटून पडले आहेत. विवेक तिवारी यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करतानाच उत्तर प्रदेशच्या राजधानीतच कायदा-सुव्यवस्था अशी असेल तर राज्यात इतरत्र काय परिस्थिती असेल असा सवालही मायावती यांनी केला.
























































