राजधानीच्या सीमेवर धुमश्चक्री, हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना फोडून काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

विविध मागण्यांसाठी दिल्लीत येऊन थडकलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहिल्यानंतर मोदी सरकारची बोबडी वळली आहे.

भारतीय किसान महासंघाने मोर्चाची हाक दिली होती ज्यामध्ये जवळपास ३० हजार शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली बैलगाड्या घेऊन सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर अडवण्यात आलं आहे.

या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे, अश्रुधुराच्या नळकांड्या असे सगळे प्रयत्न करून पाहिले मात्र शेतकरी हटत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.