शेअर बाजार आठ महिन्यांच्या उच्चांकावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाडव्याच्या सुट्टीनंतर बुधवारी शेअर बाजार उघडताच गुंतवणूकदारांची मोठी दिवाळी साजरी झाली. अवघ्या काही मिनिटांत परदेशी गुंतवणूकदारांचे बाजारात पुनरागमन झाले. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी घसरण झाली. या तेजीमुळे बाजाराने आठ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. संपूर्ण बाजार भांडवलात 4 लाख कोटींहून अधिकची वाढ होऊन ते 512.2 लाख कोटी रुपयांवर पोहचले. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1,351.64 अंशांनी (1.67 टक्के) उसळून 82,458.29 वर पोहोचला, तर एनएसईचा निर्देशांक निफ्टी 365.55 अंशांनी (1.46 टक्के) वधारून 25,410.20 च्या पातळीवर व्यवहार करत होता. फार्मा क्षेत्र वगळता निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत होते.