आसाम सीमेवर पाठवले 7 रोहिंगे, म्यानमारमध्ये करणार डिपोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहाटी

हिंदुस्थानाथमध्ये बेकायदीशीर पद्धतीने घुसखोरी करणार्‍या 7 रोहिंग्या मुस्लिमांना पोलिसांनी आसाम म्यानमावर सीमेवर पाठवले आहे. या रोहिंग्याना 2012 साली अटक केली होती तेव्हा पासून हे तुरुंगात कैद होते.

आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही नियमित प्रक्रिया आहे. हिंदुस्थानात बेकायदेशीर दाखल झालेल्या नागरिकांना परत त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येते. या सर्व सात रोहिंग्या कैद्यांना मणिपूरमध्ये पाठवण्यात आले असून तिथून त्यांना म्यानमारमध्ये पुन्हा पाठवण्यात येईल. याप्रक्रियेसाठी हिंदुस्थान आणि म्यानमारच्या अधिकार्‍यांमध्ये कागदोपत्री सर्व बाबींची पूर्तता झाली आहे.

म्यानमार सैन्याच्या कारवाईपासून या रोहिग्यांनी शेजारील देशांमध्ये आसरा घेण्यास सुरूवात केली होती. 40 हजार रोहिंग्यांनी हिंदुस्थानात आसरा घेतला आहे. बहुतांश रोहिंग्या हे दक्षिण हैद्राबाद उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कश्मीर भागात राहत आहेत. तर काही रोहिंग्यांनी हिंदुस्थानच्या ईशान्य भागात, बांग्लादेश आणि म्यानमारच्या सीमाभागात आसरा घेतला आहे.