
व्यायाम करणारी किंवा जिमला जाणारी माणसे दिवसाची सुरुवात रिकाम्यापोटी चणे खाऊन करतात. चण्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. यामुळे बदाम किंवा अन्य सुकामेव्यापेक्षा चणे खाणे आरोग्यदायी ठरते.
- चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात मँगनिज असते. शिवाय थियामिन, मॅग्नेशियम, फॉस्फरस ही पोषक तत्त्वेही भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
- चण्यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ऍनिमियासारख्या आजारापासून रक्षण होते. तसेच मेटाबॉलिजम वाढते. यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते.
- चण्यामध्ये फायटोओस्ट्रोजेन आणि सेपोनिन्स असतात. यामुळे ऍण्टीऑक्सिंडट आणि न्युट्रिएंटस मुलींच्या शरीरात होणार्या हार्मोनल बदलाला नियंत्रित ठेवते. त्यामुळे मासिक पाळीच्या वेळी स्वभाव बदलात होणारी समस्या कमी होते.
- डाएटरी फायबर चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. चणे खाल्ल्याने पित्ताचे उत्सर्जनही चांगल्या पद्धतीने होते. फायबरमुळे आपली पचनशक्ती सुधारते.
- देशी चण्यांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉलेट जास्त असते. ज्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या मजबूत होतात आणि त्याबरोबरच खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामध्ये असलेल्या भरपूर प्रथिनांमुळे हृदय निरोगी राहते.


























































