
सामना ऑनलाईन । उल्हासनगर
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात तीन दिवसांत कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या तीन घटना झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाणीचे प्रकारात वाढ असल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी शनिवारी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे.
उल्हसनगर मध्यवर्ती रुग्णालयात बुधवारी रुग्णाला दुसऱ्या वार्डामध्ये हलवण्याच्या कारण्यावरून आकाश करोति या वार्डबॉयला रुग्णाच्या नातेवाईकाने मारहाण केली होती. तर गुरुवारी मध्यरात्री रुग्णाला भेटून न दिल्याने दीपक दनवले या वार्डबॉयवर चाकू हल्ला करण्यात आला. हल्याची घटना ताजी असतांनाच शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा एका रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. तीन दिवसात हा मारहाणीचा तिसरा प्रकार घडल्याने रुग्णालयातही कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या घटनांच्या विरोधात शनिवारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे.























































