
सामना प्रतिनिधी । भामरागड
भामरागडमध्ये नक्षलवाद्यांनी महिलेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बेबी मडावी (22) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. इरपनार गावामधून दहा दिवसांपूर्वी बेबी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे लक्षलवाद्यांनी अपहरण केल्याचे सांगण्यात येते. नेलगुंडा परिसरातील परायणार क्रॉसिंगजवळ शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत लोकांनी माहिती दिल्यानंतर बेबी यांच्या आईने धोडराज पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल केली. जिल्ह्यातील महिलेची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे.






























































