वाशीच्या खाडीपुलावर ओव्हरब्रीज कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वाशी

पुण्यात होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना ताजी असताना वाशी खाडी पुलावर ब्रिज कोसळला आहे. वाशी खाडीपुलावर मानखुर्दच्या हद्दीत ओव्हरब्रीजचे काम सुरू असताना हा ब्रीज भर रस्त्यात कोसळला, त्यामुळे तेथे असलेली एक महाकाय क्रेन पलटी झाली. या बाजुने वाहतूक बंद असल्याने सुदैवाने कोणतीही प्राणहानी झालेली नाही. अपघातानांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून धीम्यागतीने वाहतूक सुरू आहे. सध्या तुटलेला ओव्हरब्रीज काढण्याचे काम सुरू आहे.