पाहा व्हिडीओ : चिखलदऱ्यात तरसाची दहशत, सात तासांच्या अथक प्रयत्नांनी पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमरावती

अमरावतीच्या चिखदलदरा तालुक्यातील गिरगुटी गावात शनिवारी एका तरसाने धुमाकूळ घातला. हा तरस रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांवर तसेच जनावरांवर हल्ला करत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गिरगुटीगाव चिखलदरा वनपरिक्षेत्रात असून तरसाच्या दहशतीमुळे शनिवारपासून येथील नागरिक रस्त्यावर फिरणाऱ्यासही घाबरत आहेत. सुदैवानं या हल्ल्यामध्ये अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही. नागरिकांनी या तरसाबाबतची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने रविवारी तब्ब्ल सात तास अथक प्रयत्न करून अखेर या तरसाला सापळ्यात पकडले.