
थंडगार दही
- गरम भातामध्ये दही मिसळा. त्यावर चवीनुसार साखर किंवा मीठ आणि मिरपूड मिसळा. आवडत असल्यास या भातावर लाल मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी घालू शकता. यामुळे चटपटीत पण पौष्टिक जेवणाचा आस्वाद चाखू शकाल.
- गोड खाणे आवडत असेल तर घट्ट दह्यामध्ये चवीपुरती साखर मिसळा. यामुळे दह्याची चव वाढेल. तसेच रात्रीच्या जेवणात त्याचा समावेश केल्यास पोटातील अतिरिक्त ऑसिडीटी नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
- जेवणानंतर ताक पिणे हा उत्तम पर्याय आहे. यामुळे पोटात थंडावा निर्माण होतो तसेच ऑसिडीटी वाढवणाऱ्या जिवाणुंवरही मात करण्यास मदत मिळते.
- केळी, डाळींबाचे दाणे, पपई किंवा सफरचंद अशी गोड फळं दह्यात मिसळून खाणे अत्यंत चविष्ट आणि आरोग्यदायी ठरते.



























































