आरेतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घेतलीत का ? हायकोर्टाने मेट्रोला खडसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

मुंबईचे फुप्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संवेदनशील आरे कॉलनीत एमएमआरडीएने मेट्रो कारशेड बनविण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी असंख्य झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार असून झाडे तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो प्रशासनाला आज फटकारले. झाडे तोडण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली होती का, असा सवाल करीत हायकोर्टाने याप्रकरणी मेट्रो प्रशासनाला जाब विचारला. तसेच याप्रकरणी बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही एमएमआरडीएला दिले.

मेट्रोसाठी आरे कॉलनीत कारशेड उभारण्यात येणार आहे. असंख्य झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याप्रकरणी अनेक पर्यावरणवादी संस्थांसह स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि महेश सोनक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली.