
सामना ऑनलाईन । उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये घरासमोर खेळत असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र अपहरणाची खबर मिलताच पोलिसांनी आरोपीला एका तासाच्या आत अटक केल्याने मोठा उनर्थ टळला. आरोपी हा अट्टल बेवडा आणि अंमली पदार्थाच्या आहारी गेलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शकील असे अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्याचे नाव असून हिललाईन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
उल्हासनगरच्या कॅम्प पाच येथील चालिया मंदिर परिसरातून या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. शकीलने या मुलाचे अपहरण करून त्याच्या घरी नेऊन लपवले होते. पोलिसांनी आरोपीच्या घराचा छडा लऊन त्याच्या तावडीतून बालकाची सुटका केली.
























































