सोनीवर लवकरच महाराष्ट्राचा सुपर डान्सर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सोनी या हिंदी मनोरंजन वाहिनीवर गाजलेला ‘सुपर डान्सर’ हा शो आता लवकरच मराठीत येतोय. महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या छोट्या उस्तादांसाठी हा शो एक व्यासपीठ ठरणार आहे.आपल्यात असणार्‍या नृत्याच्या कौशल्याला वेळीच खतपाणी मिळालं तर आयुष्य सोपं होऊन जातं. छोट्या उस्तादांमध्ये असणार्‍या नृत्यकौशल्याची जाणीव त्यांना करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सोनी मराठीवर घेतला जाणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेत्री नृत्यांगना अमृता खानविलकर आणि कोरियोग्राफर विठ्ठल पाटील… ही त्रयी सोनी मराठीच्या या शोधमोहिमेत महाराष्ट्रात सापडणारी छोटेखानी कला आपले मापदंड लावून प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सध्याच्या यंग ब्रिगेडमध्ये मोडणारा अमेय वाघ करणार आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून सोनी मराठीवर हा मराठी ‘सुपर डान्सर’ शो सुरू होणार आहे.