
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील राहूल कॉलनी येथे छापा घालून गांजा पकडल्यानंतर पुन्हा रत्नागिरीत येणारा गांजा पोलिसांनी पकडला. या कारवाईत ४५ हजार १० रुपये किंमतीचा २ किलो १७० ग्रॅम गांजा पकडण्यात आला आहे.
रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कुवारबांव रेल्वे स्टेशन फाटा येथे सापळा रचून गांजा पकडला. शिवलिंगप्पा उर्फ शिवा मल्लेशी पुजारी वय २५ रा.मुळ कर्नाटक, सध्या साळवी स्टॉप झोपडपट्टी हा मोटरसायकल एम.एच.०८ ए ए २७११ वरुन गांजा घेऊन येत होता. पोलिसांना खबर मिळाल्याप्रमाणे त्यांनी सापळा रुचून पकडले. त्याच्याकडील २ किलो १७० ग्रॅम गांजा जप्त केला. तसेच शिवलिंगप्पा उर्फ शिवा मल्लेशी पुजारी याला अटक केली.



























































