आंतरशालेय मल्लखांब स्पर्धेला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कल्याण

महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय-पुणे, क्रीडा अधिकारी ठाणे व कल्याण डोंबिवली महानगर पालिका व मल्लखांब असोसिएशन ऑफ ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अंतरशालेय जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा कल्याणच्या भाल गुरुकुल स्कूल, भाल मलंगगड रोड येथे सुरू झाली. या स्पर्धेचे उदघाटन भाल गुरुकुल स्कूलचे चेअरमन बाळाराम मुंडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या प्रसंगी क्रीडाशिक्षक संदीप गिरकर, क्रीडा शिक्षक योगेश सावंत, अक्षय चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील सर्व खेळाडूना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.