विराटला खुणावतोय सचिनचा विक्रम; वेस्ट इंडीजविरुद्ध करणार सर्वोच्च धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरचा विक्रम खुणावतोय. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडीजविरुद्ध 1573 धावा फटकावल्या असून हिंदुस्थानकडून सर्वाधिक धावाही त्यानेच केलेल्या आहेत. विराट कोहलीने विंडीजविरुद्ध आतापर्यंत 1387 धावा केल्या असून सचिन तेंडुलकरच्या धावांना मागे टाकण्यासाठी त्याला अवघ्या 187 धावांची गरज आहे.

हिंदुस्थान व वेस्ट इंडीज यांच्यामध्ये 21 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेदरम्यान विराट कोहलीला हा विक्रम मागे टाकता येणार आहे. सचिन तेंडुलकरने 39 वन डे सामन्यांमधून चार शतके व अकरा अर्धशतकांसह 52.73 च्या सरासरीने 1573 धावा तडकावल्या आहेत.