
सामना ऑनलाईन, चंद्रपूर
चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात आजीचा आणि तिच्या नातीचा खून करण्यात आला आहे. सुशीला पिंपळकर (वय-52 वर्ष) आणि श्वेता राजपूत (वय- 7 वर्ष) अशी या दोघींची नावे आहेत. या दोघींचा गळा आवळून खून करण्यात आला असून या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
हा खून कोणी आणि कशासाठी केला याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. सुशीला पिंपळकर यांच्या तीन मुली असून त्यांच्या घराशेजारीच त्यांची एक मुलगी रहात होती. श्वेता ही याच मुलीची मुलगी होती. या दोघींना ठार मारल्यानंतर आरोपींनी जाळपोळ करून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. या दुहेरी खून प्रकरणात ओळखीची व्यक्ती सामील असल्याची दाट शक्यता पोलिसांना वाटत आहे.
























































