
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत राहणाऱया पाठक या मराठी कुटुंबात दुहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे. आशा पाठक आणि उषा पाठक या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह राहत्या घरी आढळले. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांनी घरातल्या काही कामासाठी प्लंबर बोलावला होता. त्यामुळे प्लंबरनेच त्या दोघींची हत्या केल्याचा कयास पोलिसांनी वर्तवला आहे. सोसायटीतले सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस पुढील तपास करत आहेत. दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातल्या आनंदवन सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली. पाठक कुटुंबाकडे प्लंबिंगच्या कामासाठी आलेल्या व्यक्तीने दोघींचा जीव घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. धारदार शस्त्राने वार करून दोघींचा गळा आवळल्याची प्राथमिक माहिती आहे.

























































