
सामना ऑनलाईन, पुणे
वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी महेंद्रसिंह धोनी याला संघातून वगळण्यात आलं. त्याला वगळण्यामागचं कारण निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. हिंदुस्थानी संघाला दुसरा यष्टीरक्षक शोधायचा असल्याने धोनीला संघातून वगळण्यात आल्याचं प्रसाद यांनी म्हटलं आहे, हिंदुस्थानी संघात आल्यानंतर पहिल्यांदाच धोनीला टी-२० संघातून वगळण्यात आलं आहे. धोनी याच्याऐवजी निवड समितीने रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिक यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी संघात नसल्याने पंत आणि कार्तिक यांची यष्टीरक्षण तसेच फलंदाजी दोन्हीची चाचणी घेता येईल असं प्रसाद यांचं म्हणणं आहे.





























































