हे राम! रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या तीनसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

रामजन्मभूमी प्रकरणी वादाची नियमित सुनावणी 29 ऑक्टोबरपासून करण्याचे आदेश निवृत्त होण्यापूर्वी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. अब्दुल एस. नजीर यांच्या पीठाने दिले होते. त्यानुसार सोमवारी या खटल्याची पहिली सुनावणी झाली असून पुढील सुनावणासाठी आता जानेवारी 2019 ची वाट पाहावी लागणार आहे. 1994 साली सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालावर पुनर्विचाराची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा न्या. मिश्रा यांच्या पीठाने 2-1 अशा बहुमताने दिला होता.

summary- ayodhya-hearing-adjourn till january 2019