कर्नल प्रसाद पुरोहित यांना दिलासा नाही,NIA कोर्टातील खटल्याला स्थगिती देण्यास नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांना मुंबई उच्च न्यायालयाने  दिलासा देण्यास नकार दिला. एनआयए कोर्टातील खटल्याला स्थगिती देता येणार नाही असे स्पष्ट करत न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने आज कर्नल पुरोहित यांची मागणी फेटाळून लावली.

2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासहीत एकूण 11 जणांना अटक केली. या सर्वांविरुद्ध भारतीय दंड संहितेसह मोक्कासारख्या गंभीर कायद्याखाली खटला दाखल केला. मात्र नंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला. याप्रकरणी संशयितांवर एनआयए कोर्टात आरोप निश्चिती होणार असून त्याला स्थगिती देण्यात यावी अशा मागणीची याचिका कर्नल पुरोहित यांच्यावतीने हयकोर्टात  दाखल करण्यात आली होती, मात्र उच्च न्यायालयाने पुरोहित यांची मागणी फेटाळून लावली.