
सामना प्रतिनिधी । पुणे
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच शहरात रोज एक वेळ पाच तास पाणी पुरवठा करणाऱ्या वेळापत्रकाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात जाहीर केलेल्या वेळेनुसार पाणी आले नाही. त्यामुळे पाण्याची बोंबाबोंब झाली असुन ‘पुणे तिथे पाणी उणे’ असे चित्र निर्माण झाले आहे.
शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर आली आहे. शहरात कालवा फुटी आणि महापालिकेचे पाणी पुरवठयाचे पंप बंद केल्यानंतर तक्रारींमध्ये वाढ झाली होती. शहराच्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी लक्षात घेता. समान पाणीपुरवठा करण्यासाठी झोनमध्ये बदल करण्यात आले आहेत.



























































