
सामना प्रतिनिधी । किल्लारी
चोरीच्या गुन्ह्यातील औसा तालूक्यातील हसलगण येथील अरुण मच्छींद्र कांबळे (वय 35 वर्ष, रा. हसलगण ता.औसा जि लातूर) यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
औसा तालुक्यातील हसलगण येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अरुण कांबळे हा 2008 साली पासून फरार होता. तो आरोपी गावी आला आहे व त्याच्या घरी आहे, अशी माहिती मिळताच बुधवारी किल्लारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी पो.हे.कॉ. टी.बी. चव्हाण व टी.ए. पठाण यांना हसलगण गावी पाठवले व हा आरोपी तोच आहे अशी खात्री केली. त्यानंतर आरोपीस ताब्यात घेतले व कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


























































