पत्रकारांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात हिंदुस्थान 14 व्या स्थानावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

पत्रकारांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात हिंदुस्थान उदासीन असून या मारेकऱ्यांना शिक्षा ठोठावणाऱ्या देशांच्या यादीत हिंदुस्थान 14 व्या स्थानावर आहे. अशी धक्कादायक माहिती अमेरिकेतील ‘कमिटी टू प्रॉटेक्ट जर्नलिस्ट’ (CPJ) या स्वयंसेवी संस्थेने दिली आहे. विशेष म्हणजे याच स्थानावर हिंदुस्थान कायम असल्याचे हे 11 वे वर्ष आहे. असं संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

या उदासीनतेमागे मूळ कारण हिंदुस्थानमधील राजकारण असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. हिंदुस्थानमध्ये पत्रकाराच्या हत्येचे कारणही तपासले जात नाही. कारण त्यातील बरेच धागेदोरे हे राजकारणी मंडळींबरोबर जुळलेले असतात. यामुळे पत्रकाराच्या हत्येचा तपास लांबवला जातो असेही यात सांगण्यात आले आहे.

यावर्षाच्या 2018 च्या यादीत हिंदुस्थानसहित 14 देशांनाही सामील करण्यात आलं आहे. यात सोमालिया, सीरिया, इराक, दक्षिण सूदान, फिलिपाईन्स, अफगाणीस्तान, मॅक्सिको, कोलंबिया, पाकिस्तान, ब्राझील, रशिया, बांग्लादेश आणि नायजेरिया या देशांचा समावेश आहे. यातही सोमालियात परिस्थिती सुधारत असून 14 व्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानात मात्र चिंतेचे वातावरण आहे. हिंदुस्थानात 14  पत्रकारांच्या हत्येची प्रकरणे असून त्यातील एकही प्रकरण अजून निकाली निघाले नाही. असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पण त्याचबरोबर पाकिस्तानमधील मात्र परिस्थिती सुधारत असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.