भरतीचं स्वप्न कारनं चिरडलं; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, परभणी

पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असणाऱ्या चार तरुणांना भरधाव कारने चिरडले आहे. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामधील माटेगाव इथे हा प्रकार घडला आहे. सोनू साबळे आणि गोविंदा साबळे (वय-२१ वर्ष) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.