सचिनची धोनीसाठी मैदानाबाहेर बॅटिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडियाचा माजी कर्णधार एम.एस. धोनीला विंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघासोबत होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेतून वगळण्यात आल्यानं क्रिकेट जगतात नवीन वादाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं तर काहींनी निवड समितीच्या निर्णयावर ताशेरे ओढले. धोनीला संघातून वगळण्याच्या निर्णयावर आता सचिन तेंडुलकरने देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत सचिनची भविष्यवाणी, विराटच्या फॉर्मवरही केलं भाष्य

सचिन म्हणाला की, ‘धोनीला संघातून वगळण्याच्या निर्णयामागे निवड समितीची काय मानसिकता आहे आणि ड्रेसिंग रुममधील वातावरण सध्या कसं आहे याची मला माहिती नाही. तसेच त्यांच्यात जे निर्णय झाले ते उघड होऊ नये. त्यामुळे याबाबत प्रश्न उपस्थित करणार नाही. परंतु धोनी या छोट्या फॉर्मेटमधील जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे की कधी-काय करायचं. तसेच मी देखील अशा प्रसंगांना सामोरो गेलो आहे, त्यावेळी मला माहिती होतं की काय करायचं आहे. त्याप्रमाणे धोनीलाही माहिती आहे की त्याला काय करायचं आहे.’

याआधी धोनीला विंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघासोबत होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी आराम दिल्याचे सांगण्याय येत होते, परंतु त्यानंतर त्याला वगळण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तसेच याची माहिती धोनीला देण्यात आली होती, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विंडीजविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने धोनीला संघातून वगळण्याच्या निर्णयामध्ये आपला हात नसल्याचं स्पष्ट केलं होतं.