झेंडु फुलांच्या मागणीत घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नवीन वस्तू, वाहन सोन्या चांदीचे दागिने, कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी उसळली असून कापडबाजार, दिल्लीगेट, चितळेरोड, माळीवाडा, मार्केटयार्ड आदी ठिकाणी येणार्‍या झेंडू फुलांची मागणी घटताना दिसत आहे. आजच्या रेडीमेड जमान्यात सर्वत्र कापडी फुलांच्या तोरणाला, दाराच्या तोरणाची मागणी वाढत असल्याचे चित्र असून यातुन झेंडु, शेवंती आदी फुलांची मागणीत घट झाला असल्याचे बाजारपेठेत पहायला मिळाले आहे.

आज झेंडुच्या फुलाचे दर 40 ते 50 रुपये तर शेवंती 60 ते 70 रुपये किलोनी विकण्यात आले आहे. बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली आहे. तसेच या सणानिमित्त झेंडुच्या फुलांना मागणी वाढली आहे. बाजरात मोठ्याप्रमाणात झेंडुच्या फुलांची आवक झाली आहे.