धुक्याने केला घात, वसईत बसने चार म्हशींना उडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वसई

पहाटेच्या धुक्यात रस्त्याकरून जाणाऱ्या चार म्हशींना भरधाव बसने दिलेल्या धडकेत दोघींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथील पापडी उमेळा फाट्यावर घडली. या अपघातात जखमी झालेल्या दोन म्हशींची प्रकृती गंभीर असून बसचालकावर बेदरकारपणे काहन चालकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अहवाल मागकला आहे.

वसई-विरार पालिकेच्या परिवहन सेवेअंतर्गत ‘मे भगीरथी ट्रान्सपोर्ट’ या खासगी कंत्राटदाराकडून बसेस चालवल्या जातात. त्यातील वसई गाव ते अंबाडी (वज्रेश्करी) या बससमोर पापडी उमेळा फाटा येथे अचानक चार म्हशी आल्या. धुक्यामुळे या म्हशी चालकाला दिसल्या नाहीत. त्यातच बसची म्हशींना जोरदार धडक बसल्याने दोन म्हशींचा तडफडून जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन म्हशी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर विव्हळत पडल्या होत्या. पहाटे धुके पडले होते. समोरून येणाऱ्या ट्रकमुळे बिथरलेल्या म्हशी अचानक बससमोर आल्या.

उपजीविकेचे साधन हिरावले
पापडी गुरुद्वाराजवळील तबेल्याचे मालक अल्माका मिसाळ यांच्या गोठ्यातून या म्हशी नजर चुकवून बाहेर पडल्या होत्या. त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय असून या म्हशींच्या दुधाच्या धंद्यावर त्यांच्या कुटुंबाची गुजराण होते. मात्र म्हशींच्या मृत्यूनंतर मिसाळ यांचे तीन लाखांचे नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे उपजीविकेचे साधनच हिराकले आहे.

मुरुडमध्ये तीन गायींचा किषबाधेमुळे मृत्यू
मुरुड : विषारी जनावराचा दंश झाल्याने येथील गोल बंगला परिसरातील तीन गायींचा मृत्यू झाला. या गायींना विषबाधा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीत निष्पन्न झाले असून गोल बंगला परिसरात नगर परिषदेची राखीव जागा आहे. तेथे चरताना या बेवारस गायींना दंश झाला होता.