
सामना प्रतिनिधी । नगर
भारिप-बहुजन महासंघाच्या नगर जिल्हा अध्यक्षपदी बारा बलुतेदार नेते अशोक सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी ही निवड केली. यावेळी युवक व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
महानगरपालिकेच्या सर्व जागा भारिप बहुजन महासंघ व या मायम एकत्र लढणार असल्याची घोषणा सोनवणे यांनी केली. भारिप बहुजन महासंघाच्या महासचिवपदी साळवे, संघटक म्हणून नितीन घोडके, उपाध्यक्षपदी राजेंद्र काळे, विनोद गायकवाड, सचिव प्रकाश भोसले यांची निवड करण्यात आली. भारिप बहुजन महासंघाच्या शहर युवक अध्यक्षपदी योगेश साठे महासचिवपदी सुरेश कुंडलकर संघटक म्हणून अतुल सरोदे तर सहसचिवपदी रंजन साळवी यांची नियुक्ती करण्यात आली. भारिप-बहुजन महासंघाच्या शहर कार्यकारणी करण्यात आली. अध्यक्षपदी बाबासाहेब घुले महासचिवपदी सुनील शिंदे सचिन भानुदास फुले यांची तर संघटकपदी प्राध्यापक विठ्ठल वाघमोडे यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले, महापालिकेच्या सर्व जागा भारिप बहुजन महासंघ एम आय एम ओ बी सी सेवा संघ बारा बलुतेदार महासंघ वंचित मराठा समाज बहुजन क्रांती पक्ष तसेच इतर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढविणार येणार आहे असे त्यांनी सांगितले.






























































