
सामना ऑनलाईन, मुंबई
शहापूर आणि कर्नाटकातील हुबळीजवळ झालेल्या दोन रस्ते अपघातात महाराष्ट्रातील एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हाच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्यांना उडवलं. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून इतर 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.
कर्नाटकातील धारवाडमध्ये अन्नई गेरे तालुक्यात एक खासगी बस आणि ट्रक समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जण दगावले असून हे सगळे जण मुंबईचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईहून हंपीला जात असताना ही दुर्घटना घडली आहे.































































