VIDEO: चर्चगेट- विरार लोकलमध्ये तळीरामांचा धिंगाणा, खुलेआम रंगली पार्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वेवर धावत्या लोकलमध्ये तळीरामांनी सिगरेट आणि दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी रात्री चर्चगेट-विरार लोकलमध्ये तीन तळीराम लगेजच्या डब्यात बसून खुलेआम दारू पिऊन सिगारेट ओढत होते. यावेळी त्यांना काही प्रवाशांनी जाब विचारला, मात्र्य त्यांच्याशी या तळीरामांनी हुज्जत घातली. शनिवारी रात्री 10.18 च्या चर्चगेट – विरार लोकलमधील हा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे.

रेल्वेमध्ये ज्वलनशील पदार्थ नेण्यास आणि धुम्रपानास मनाई आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवत धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर रेल्वे प्रशासनाकडून काय काराई केली जाते याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.