मुंबईत सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cyber-crime
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत सायबर गुन्ह्यांत वाढ होताना दिसत असून राज्यात मुंबईत सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सायबर हल्ले रोखण्यासाठी राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत शिवसेना आमदार सुभाष भोईर, अनिल बाबर, सुनील प्रभू आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील सायबर गुन्ह्यांची माहिती विचारण्यात आली होती. सायबर गुह्यांचे वाढत प्रमाण लक्षात घेऊन करण्यात येणाऱया उपाययोजनांबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यावर राज्यात ऑक्टोबर 2017 पर्यंत 2 हजार 654 तर ऑक्टोबर 2017 पर्यंत 2 हजार 945 गुन्हे नोंदवण्यात आले. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हे व पोलीस आयुक्तालय मिळून एकूण 47 सायबर लॅब सुरू केल्या आहेत. सर्व जिल्ह्यातील पोलीस आयुक्तालयातील 43 सायबर लॅब सायबर पोलीस ठाणे घोषित करण्यात आले आहे. त्यापैकी 36 सायबर पोलीस ठाणी कार्यरत झाली आहेत. उर्वरित सात सायबर पोलीस ठाणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू आहे असे मुख्यमंत्र्यानी लेखी उत्तरात सांगितले.