
सामना प्रतिनिधी । लातूर
लहान मुलास माझ्या घरी का पाठवलेस म्हणून मारहाण करुन मोटारसायकल जाळून टाकल्याची घटना महाराणा प्रताप नगर भागात घडली. या प्रकरणी दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेताजी ज्योतीराम शिंदे रा. महाराणा प्रतापनगर यांनी या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सुजीत दिगंबर बारसकर आणि त्याच्या सोबत असणाऱ्या अन्य एकाने फिर्यादीच्या घरात घुसून तू तूझ्या लहान मुलास माझ्या घरी का पाठवलास म्हणून शिवीगाळ केली. लाथाबुक्यांनी मारहाण केली. काठीने डोक्यात मारुन डोके फोडले, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या घरासमोर लावलेली मोटारसायकल जाळून टाकली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस कर्मचारी परकोट हे करीत आहेत.































































