निलंगा येथे थांबलेली ट्रॅव्हल्स जळाली की जाळली याचीच चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

निलंगा येथे औसा रस्त्यावर थांबलेली खाजगी ट्रॅव्हल्स बस जळून खाक झाली. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र ही खाजगी ट्रॅव्हल्स बस जाळली कि जळाली याचीच चर्चा होत आहे.

निलंगा – औसा रस्त्यावर निलंगा शहरापासून सुमारे एक कि. मी. अंतरावर रस्त्याच्या कडेला उभी असलेली खाजगी ट्रॅव्हल्स (क्रमांक एम एच १२ के क्यू ४००५) आज पहाटे जळाली. गाडीत कोणीच नव्हते त्यामुळे जिवीत हानी टळली. अचानक गाडी कशी काय पेटली. जाळली कि जळाली याचीच चर्चा होत होती.