
सामना प्रतिनिधी । नगर
गावठी कट्टा बेकायेदशीर बाळगणाऱ्या दोन आरोपींचा पाठलाग करुन त्यांना पकडले असून त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. येथील स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपीमध्ये अमोल शेजवळ (वय 21, राहाणार घोडेगाव, तालुका नेवासा), कृष्णा माळी (वय 25, राहणार घोडेगाव) यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार घोडेगाव येथील घोडेश्वरी विद्यालय परिसरात दोन जण पळून जाताना दिसून आले. त्यांचा पाठलाग करुन त्यांना सापळा रचून मोठया शिताफीने पोलिसांनी पकडले. त्यांची झडती घेतली असता यातील अमोल याच्याकडे 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आढळला. अधिक चौकशी केल्यावर माळी याच्याकडून विकत घेतल्याचे सांगून पोलिसांनी त्यालाही अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, रोहण खंडागळे, योगेश गोसावी, दिगंबर कारखीले, मल्लीकार्जुन बनकरख, रविंद्र कर्डीले, योगशे सातपुते, सुरज वाबळे, बाबासाहेब भोपळे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून सोनई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
































































