
सामना प्रतिनिधी । दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचे असेल तर पाच रुपये खर्च करा. यामुळे पंतप्रधानांची भेट होईल. तसेच पाच रुपये दिल्यानंतर एक टी शर्ट आणि एक कॉफी मग मिळू शकेल. नमो ऍपवर ही देणगी द्यायची आहे. पाच रुपयांपासून जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यंतची ही देणगी देता येईल.
नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून जनतेला आवाहन केले होते की, नरेंद्र मोदी अॅपद्वारे जनतेला भाजपाला देणगी देता येईल. जनतेने भाजपाला देणगी द्यावी आणि कारभारात पारदर्शकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा.
कशी देणगी द्याल
नमो अॅपच्या सहाय्याने डोनेट केल्यानंतर एक रेफरल कोड मिळेल. हा कोड व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसच्या सहाय्याने 100 लोकांना पाठवायचा आहे. तुम्ही पाठवलेल्या 100 लोकांनी जर तुमच्या रेफरल कोड वापरून नमो अॅपला डोनेशन दिले तर पंतप्रधानांना भेटायची संधी मिळू शकते. ही संधी हुकली तर रेफरल कोड पाठवलेल्या 100 लोकांपैकी जर 10 लोकांनी तुमचा रेफरल कोड वापरून जरी डोनेशन दिले तर एक नमो टी शर्ट आणि कॉफी मग मिळेल.




























































