किनगावमध्ये नापिकीस कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किनगाव

लातूर जिल्ह्यातील किनगाव येथून जवळच असलेल्या मोहगाव (खा.) येथील अल्पभुधारक शेतकरी नागनाथ हणुमंत सिरसाठ (वय ३५) यांनी खरीप नापिकीस कंटाळून सोमवारी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहगाव येथील नागनाथ हणुमंत सिरसाठ हे गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या वडिलांपासून विभक्त राहून संसार करत होते. त्यांच्या नावावर तीन एकर जमीन होती मात्र त्यातून मागील दोन वर्षात खर्चापुरतेही उत्पन्न झाले नसल्याने घरखर्च भागवने नागनाथ यांना मुश्कील झाले होते. शेतातील खरीप नापिकीला व घरखर्चास कंटाळून सोमवारी पहाटे हरभरा पिकास पाणी देत असताना त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश उणवने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.पी. गोखरे हे करत आहेत. नागनाथ सिरसाठ यांच्या पश्चात आई -वडिल, पत्नी, २ मुली व एक मुलगा असा परिवार आहे.