पर्थवर हिंदुस्थानचा कस लागणार – रिकी पाँटिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन

हिंदुस्थानने पहिली कसोटी जिंकली असली तरी 14 डिसेंबरपासून पर्थ येथील वेगवान गोलंदाजांना पोषक अशा खेळपट्टीवर दुसरा सामना रंगणार आहे. तेथील वातावरण व खेळपट्टी हिंदुस्थानपेक्षा ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी अनुकूल असणार आहे. त्यामुळे पर्थवर ऑस्ट्रेलियाला हरवणे हिंदुस्थानसाठी कठीण असणार आहे, असे मत व्यक्त केले आहे कांगारूंचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने.
नाणेफेकऐवजी बॅट उडणार
क्रिकेट या खेळाच्या नियमांमध्ये बदल करण्यात पुढे असणाऱया ऑस्ट्रेलियाकडून आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग या टी-20 स्पर्धेतील लढतींमध्ये नाणेफेक रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून त्याऐवजी आता बॅट उडवली जाणार आहे. नाणेफेकीदरम्यान कर्णधारांना छापा की काटा याऐवजी सपाट किंवा उंचवटा असा पर्याय निवडायचा आहे. 19 डिसेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.